आरोग्य अभियानांतर्गत ( NHM )काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनसेचा पाठिंबा

0
68

वणी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ( NHM) काम करणाऱ्या हजारो कर्मचाराऱ्यानी आपल्या न्याय मागण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला मनसे नेते राजु उंबरकर यांनी पाठिंबा दिला आहे, ( NHM ) एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा यवतमाळ यांच्या पदाधिकारी यांची भेट घेऊन राजु उंबरकर यांनी त्यांच्या मागण्या निदर्शनास आणून दिल्या, आंदोलकांच्या मागण्या रास्त असून मनसे त्यांच्या हक्कासाठी शासनाकडे पाठपुरावा करेल, असी ग्वाही राजु उंबरकर यांनी आंदोलकांना दिली, (NHM ) कर्मचारी अनेक वर्षांपासून त्यांना कमी मानधन व असुरक्षित परिस्थितीत काम करावे लागते, कोरोना काळात त्यांनी जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा चालू ठेवली, शासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, त्यांच्या मुख्य मागण्या वेतन वाढ, विमा संरक्षण, ग्रॅच्युइटी व बदली धोरण यांचा समावेश आहे, या मागण्याची पूर्तता लवकर होणे गरजेचे आहे, असे मनसे नेते राजु उंबरकर यांनी म्हटले आहे, राजु उंबरकर यांनी (NHM) कर्मचारी शिष्ट मंडळाला सांगितले की, मनसे या प्रकरणात जातीने लक्ष घालून राज्याचे आरोग्यमंत्री मंत्री व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाईल व मनसे कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढा देईल व नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिल असी ग्वाही राजु उंबरकर यांनी दिली, या भेटीदरम्यान आरोग्य अभियानांतर्गत (NHM) काम करणारे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते,