आदिवासी उद्योग जञेत मशरूम शेतीचा नवा मार्ग: युवकांना स्वावलंबनाची प्रेरणा

0
284

आदिवासी उद्योग जत्रेत मशरूम शेतीचा नवा मार्ग; युवकांना स्वावलंबनाची प्रेरणा

प्रतिनिधी – पांढरकवडा

पांढरकवडा येथे आयोजित जंगोबाई आदिवासी उद्योग जत्रेत मशरूम (अळिंबी) उत्पादनावरील मार्गदर्शन शिबिराने विशेष आकर्षण ठरले. दिनांक २२ मार्च २०२५ रोजी पार पडलेल्या या शिबिरात अक्कलकुवा (जि. नंदुरबार) येथील तज्ज्ञ राजेंद्र वसावे यांनी अत्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले.

मशरूम शेती ही कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारी असल्याने ग्रामीण व आदिवासी भागासाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. उत्पादन वाढविण्याचे तंत्र, रोग व्यवस्थापन तसेच बाजारपेठेत थेट विक्रीच्या संधी याबाबत त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली.

या शिबिरामुळे युवक-युवती व शेतकरी यांच्यात स्वावलंबनाची नवी उमेद निर्माण झाली आहे. पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून मशरूम शेतीकडे वळण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला.

जत्रेच्या माध्यमातून आदिवासी भागात उद्योगशीलतेचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
“मातीशी नातं, कष्टांवर विश्वास,
यातूनच घडतो यशाचा सुवर्ण इतिहास.
एकतेच्या जोरावर उभा राहतो समाज,
आणि त्यातूनच सुरू होतो प्रगतीचा प्रवास.”