माहात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित ” समता पर्व ” कार्यक्रम
प्रा कु. प्रतीक्षा ताई गुरुनुले यांचे प्रभावी विचार प्रवर्तक मार्गदर्शन!
तालुका प्रतिनिधी :
स्थळ : झरी जामणी
झरी जामणी : दि १४ एप्रिल रोजी महापुरूष जयंती उत्सव समिती झरी जामणी यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित ” समता पर्व ” कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भिमरावजी दडाजे ( महाजन )
कार्यक्रमाचे उद्घाटक : सौ शिलाताई पुंडलिकरावजी चौधरी ( नगराध्यक्ष) झरी( जामणी )
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात प्रतीमापुजन व दिपप्रज्वलनाने झाली. यानंतर उपस्थित अध्यक्ष व प्रमुख यांचे स्वागत करण्यात आले.
वर्ण व्यवस्था, जातीव्यवस्था यांनी ग्रासलेल्या देशात भारतीय बहुसंख्य असलेल्या बहुजन समाजाला अनेक मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले होते.
माहात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा वापर करून वर्णधिष्टित व्यवस्थेत नाकारलेल्या शुद्र समाजाला शिक्षणाची दारे मोकळी करून दिली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माहात्मा ज्योतीबा फुले यांना आपला गुरू मानून आपले शिक्षण पूर्ण करून दबलेल्या, पिचलेल्या शुद्रांना वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने केले. जगातील सर्वात मोठे संविधान लिहून भारतातील बहुसंख्य बहुजन समाजाला मुलभूत हक्क प्राप्त करण्याचे शस्त्र दिले. बाबासाहेबांच्या भारतीय संविधानामुळे मूलभूत हक्काचा अधिकार मिळाला.
बाबासाहेब असे म्हणतात या देशात लोकशाहीचा विकास करायचा असेल तर आम्हाला गुणवंतेचा विकास पाहिजे. गुनवंतेचा विकास म्हणजे निर्णय क्षमता, सहानुभूती शिस्त, आणि सहकार्याची भावना निर्माण होते. गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो.
असे रोखठोक प्रतिपादन झरी जामणी येथे झालेल्या माहात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त ” समता पर्व ” कार्यक्रमात
प्रा कु. प्रतीक्षा ताई गुरुनुले यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन : महापुरूष जयंती उत्सव कृती समिती झरी जामणी यांनी अतिशय सुंदर नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली, मन: पुर्वक अभिवादन व आभार, ज्ञान, समता आणि संघर्षाचा संदेश देणारे हे क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.




