तालूक्यात युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळख निर्माण करणारे मंगेश मोहीतकार यांची युवासेना तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

0
131

” तालूक्यात युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळख निर्माण करणारे मंगेश मोहीतकार यांची युवासेना तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती:

तालुका प्रतिनिधी : झरी जामणी

झरी जामणी : शिवसेना ( उबाटा) पक्षप्रमुख मा श्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात युवासेना नवनवीन पदाधिकारी यांच्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये झरी जामणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री मंगेश मोहीतकार यांची युवासेना तालुका अध्यक्ष झरी जामणी या पदावर नियुक्ती करण्यात आली.

: राजकीय क्षेत्रात दांडगा जनसंपर्क :

विस वर्षांपासून ते शिवसेनेत कट्टर शिवसैनिक म्हणून काम करत आहे, त्यांचा राजकीय प्रवास छोटासा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आहेत , २०२३ मध्ये सिंधीवाढोणा सोसायटी संचालक, २०२४ मध्ये उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी जामणी, आणि २०२६ मध्ये युवासेना तालुका अध्यक्ष झरी जामणी या पदावर नियुक्ती करण्यात आली,
पक्षाची विचारधारा घराघरात पर्यंत पोहचवने, जनसामान्य मानसाचे प्रश्न सोडवणे, पक्ष संकटात सापडला असतांना एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्षासोबत राहणे, त्यांच्या या एकनिष्ठेमुळे त्यांनी तालूक्यात युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळख निर्माण केली. झरी जामणी युवासेना तालुका अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली,
मा श्री संजय देरकर ( आमदार वणी विधानसभा) यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन मंगेश मोहीतकार यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली व पक्ष अधिक मजबूत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
झरी जामणी तालुक्यात शिवसैनिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मित्रपरिवार व सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पक्षाची विचारधारा व एकनिष्ठेने पक्षा सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे.