* बुद्धिवान* चा सिंधीवाढोणा येथे जिल्हा परिषद शाळा व ग्रामवासी यांच्या हस्ते सत्कार

0
76

*बुद्धिवान* चा सिंधीवाढोणा येथे जिल्हा परिषद शाळा व ग्रामवासी यांच्या हस्ते सत्कार

तालुका प्रतिनिधी :
झरी जामणी – वणी तालुक्यातील कायर या गावचे बिंबिसार निखाडे या शेतकऱ्यांचे पुत्र बुद्धिवान(प्रशांत) बिंबिसार निखाडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कायर येथे झाले माध्यमिक शिक्षण कायर येथीलच विवेकानंद विद्यालय कायर येथे झाले महाविद्यालयीन शिक्षणासाठी एसपीएम कॉलेज वणी येथे अकरावी बारावी विज्ञान शाखेत बिना शिकवणी करता प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण करून ग्रॅज्युएशन साठी लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे बीएससी साठी प्रवेश घेतला तीन वर्ष सातत्यपूर्ण अभ्यास करून शेवटच्या वर्षाला त्यांनी ठरवलं की पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा 2017 मध्ये पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला 2 वर्ष सतत अभ्यास केल्यानंतर 2019 च्या शेवटच्या वर्षात कोरोना ने त्यांना गावी यावे लागले 2020 मध्ये एक वर्ष त्यांनी घरी अभ्यास केला त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेत PSI,STI,ASO आणि 2021 च्या आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेत दुसऱ्यांदा PSI STI ASO अशा कोरोना महामारीने रखडलेल्या परीक्षेचा निकाल एकदाच 15 दिवसाच्या अंतराने लावण्यात आला आणि एकदाच सलग 6 उच्चपदस्थ पदांना गवसणी घालणारा अवलिया गावाने तालुक्याने पाहिला तेव्हाच 2021 च्या राज्यसेवेचा अंतिम पेपर आणि मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून रुजू होण्याची धावपळ यामुळे 2021 च्या मुख्य परीक्षेत हुलकावणी बसली त्यानंतर 2022 च्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारली पण थोडक्यात पोस्टने हुलकावणी दिली पुन्हा त्याच जोमाने 2023 च्या राज्यसेवेचा अभ्यास केला व 2023 च्या राज्यसेवेत मुलाखती नंतर त्यांची सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली व परत एकदा गावात जल्लोष झाला सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून अकोला जिल्ह्यातील अकोला पंचायत समिती मध्ये कार्यरत आहेत. 30 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निकालात 561.25 गुणांसह महाराष्ट्रातून अनुसूचित जातींमध्ये व विदर्भातून पहिला येण्याचा मान मिळविलाआहे. त्यांच्या या यशावरून असे दिसून येते की उच्च पदांना गवसणी घालायची असल्यास शहरातून महानगरातून शिक्षण अथवा अभ्यास केला तरच यश मिळते असे दिसून येत नाही तर सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही आपली प्रतिभा दाखवून गावाचे तालुक्याचे नाव उज्वल करू शकतात. बुद्धिमान यांचा स्वभाव प्रेमळ आणि नम्र असल्यामुळे परिसरातील अभ्यास करणारे विद्यार्थी नम्रपणे त्यांना काही विचारल्यास ते हसतमुखाने मार्गदर्शन करतात त्यामुळे ते मित्रांमध्ये खूप प्रिय, आहेत त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना एक ऊर्जात्मक प्रेरणा मिळेल .बुद्धिमान म्हणाला, “माझे यश महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी अर्पण करतो” त्यांच्या या यशांची परंपरा 2020 पासून सुरू होऊन 2025 पर्यंत अशीच अविरत चालू आहे,
दिवाळी संपून तिन महीने झाले. तरी बुद्धिवान च्या यशाच्या जल्लोषात कायर परीसरातील वातावरण आनंददाही आहे. फटाक्यांच्या आतिशबाजी ने आसमान दुमदुमून गेले आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्हा परिषद शाळा सिंधीवाढोणा व ग्रामवासी सिंधीवाढोणा यांच्या हस्ते दि. २ मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा सिंधीवाढोणा येथे त्यांच्या सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री विनोद निखाडे ( सरपंच) प्रमुख पाहुणे श्री पुरुषोत्तम आवारी , श्री बबन चांदेकर (मुख्याध्यापक सिंधीवाढोणा) श्री ज्ञानेश्वर गानफाडे ( पोलीस पाटील) श्री पद्ममवार साहेब ( ग्रामविकास अधिकारी)श्री राजीव आस्वले, श्री नंदकिशोर अंबोरे, श्री मंगेश मोहीतकार, श्री अतुल निखाडे, श्री पंचशील निखाडे, श्री गजानन म निखाडे,श्री गणपती आवारी, श्री चंपत आवारी, श्री कैलास निखाडे, श्री सुमित बुरडकार, श्री गजानन निखाडे, श्री शंकर निखाडे व गावातील नागरिक व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री सुमित बुरडकार यांनी केले.
त्यांच्या या यशामुळे गावाबरोबर तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावर गाजत आहे…