वीर बापूराव शेडमाके जयंतीनिमित्त शा. आ. शाळा माथार्जुन येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
102

वीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त शा.आ.शाळा माथार्जुन येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न

तालुका प्रतिनिधी:

झरी जामणी : माथार्जुन शासकीय आश्रम शाळा माथार्जुन येथे आदिवासी क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मनोगत व भाषणाने झाली. विद्यार्थ्यांनी बाबुराव शेडमाके यांच्या शौर्यगाथेचे व कार्याचे सुंदर वर्णन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मा. योगेशभाऊ मडावी, सरपंच मा. रविभाऊ कायतवार, एस.एम.सी. अध्यक्ष श्री. भीमरावजी मडावी, मुख्याध्यापक श्री. अविनाश मोरे तसेच प्राथमिक शिक्षक श्री. स्वप्नील आत्राम यांनी आदिवासी क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतीकारी कार्य व जीवनचरित्राबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुंदर संचलन कु. नाझ मॅडम (माध्यमिक शिक्षिका) यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद व चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.