मेंढोली गावाजवळील पारधी समाज विकासापासून वंचित…

0
186

वणी : तालुक्यातील मेंढोली येथे गेल्या २० वर्षांपासून वास्तव्यास असलेला पारधी समाजाला निवडणुकीपूरते महत्व दिले जाते, आदिवासी पारधी समाजाच्या वस्तीवर मुलभूत सुविधा रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, शौचालय, नाली बांधकाम, आरोग्य सुविधा आणि अंगणवाडी यासारख्या अत्यावश्यक गोष्टी नसल्याने या समाजाला विकासापासून वंचित राहावे लागतात, आणि या समाजाला अमानवीय परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे, राजकीय नेते केवळ हा समाजाचा मतदानासाठी वापर करतात, असा आरोप येथील स्थानिक रहिवासी प्रियंका पवार, विनीता काळे आणि प्रकाश भोसले यांनी केला आहे, या वस्तीत २४ कुटुंबे आणि १०० हुन अधिक लोक राहतात, शासकीय परिपत्रकानुसार निवासी अतिक्रमण नियमीत करण्याची कार्यवाही मेंढोली ग्रामपंचायतीने अद्याप केलेली नाही आहे, वस्तीत कोणत्याही सुविधा मिळत नाही, आम्हाला फक्त मतदानासाठी गृहीत धरले जाते, मेंढोली गावाजवळून ४० ते ५० मीटरच्या अंतरावर असूनही आम्हाला विकासापासून वंचित राहावे लागतात, असे समाज बांधव सांगतात, पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचून परिस्थिती बिकट होते, अन्नधान्य भिजते आणि डेंग्यू मलेरिया सारख्या रोगांची साथ वाढतात, असी व्यथा प्रियंका पवार यांनी मांडली, वस्तीवर वीज नसल्याने रात्रीला साप विंचू सारख्या विषारी प्राण्यांपासून जिवाला धोका निर्माण होऊ शकते, वीज नसल्याने मुलांना अभ्यास करणे अशक्य होते, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पाण्यासाठी दूरवर भटकावे लागते, शौचालयांच्या अभावामुळे स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण होतात, आरोग्य सुविधा नसल्याने किरकोळ आजारांवरही उपचार मिळत नाही, ज्यामुळे कुटुंबांना नेहमी त्रास सहन करावा लागतो, जातीयवादी दृष्टीकोनामुळे हा समाज त्रस्त आहे, आदिवासी पारधी समाजाला निवडणुकीपूरते महत्व देणें बंद करून त्यांना माणुसकीच्या नात्याने समान हक्क आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक पारधी समाजाने केली आहे, पारधी समाजाने शासनाकडे तातडीने मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य आणि शिक्षण या सारख्या सुविधा मिळाल्यास हा समाज मुख्य प्रवाहात येऊ शकतो, देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष पूर्ण झाले, तरी पारधी समाजाला उपेक्षित राहने हे लोकशाहीसाठी लाजिरवाणे आहे, प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पारधी समाजाच्या वस्तीचा विकास करावा, अशी मागणी होत आहे,