अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी मुकूटबण पोलीस स्टेशनला मनसेच्या वतीने निवेदन…

0
220

झरी : तालुक्यातील मुकूडबन परिसरात असलेल्या वरली मटका आणि इतर अवैध व्यवसाया मुळे सामाजिक आरोग्य बिघडते आहे, या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झरी जामणी तालुका अध्यक्ष गजानन मिलमिले यांनी मुकूडबन पोलीस स्टेशनला कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही दिला आहे, काही दिवसा पासून मुकूडबन पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध दारू विक्री व मटका, जुगार मोठ्या प्रमाणात चालू असून या धंद्यामुळे तरूण पिढी व्यसनाहीत होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहे, यातून परिसरात अशांतता निर्माण झाली आहे, अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी करीता गजानन मिलमिले, निलेश नवले, अमोल डोहे, किशोर सिरसागर दिनेश चारलेकार व इतर कार्यकरते निवेदन देतांना उपस्थित होते,