महाराष्ट्र शासन कामगारांच्या हितासाठी सुरू केलेल्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या गृप उपयोगी वस्तूंचा (भांडी) वाटपावरून यवतमाळ जिल्ह्यातील कामगारांच्या मनात तीव्र असंतोष पसरला आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना २५० ते ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सेलू गावला जावे लागत आहे, त्यामुळे एका कामगारांच्या प्रवासावर येनारा खर्च २५०० ते ३००० रुपये इतका आहे, हा कामगारांना परवडणारा नसुन अनेक जन या योजनेपासून वंचित राहत आहे,
*योजनेतील कामगारांची आर्थिक कुचंबणा:
यवतमाळ जिल्ह्यातील विस्तार मोठा असल्याने झरी,मारेगाव, वणी, कळंब , केळापूर, आर्णी या सारख्या विविध तालुक्यातील कामगारांना सेलू येथे जाण्यासाठी मोठा प्रवास करावा लागतो, या प्रवासाचा आर्थिक भार कामगारांना परवडत नाही, सरकारने योजना केली पण प्रशासनाच्या बेफीकरीमुळे कामगारांचे जिवन कोंडीत सापडलेले आहे,
▪️मनसेचा अल्टीमेटम
मनसे नेते राजु उंबरकर यांनी मंडळाचे अध्यक्ष व जिल्हा कामगार अधिकारी यांना निवेदन देत प्रत्येक तालुक्यात गृह उपयोगी वस्तू वाटप केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे, यामुळे कामगारांच्या वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल असे त्यांचे म्हणणे आहे, येत्या दोन ते तीन दिवसात यावर निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगारांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल असा इशारा राजु उंबरकर यांनी दिला आहे,




