शासकीय कामकाजाची पाहणी करीत असतांना सचिवांना मारहान
तालुका प्रतिनिधी
झरी जामणी: तालुक्यातील मुकुटबन येथील ग्रामपंचायत अधिकारी पोत रेड्डी नागोराव बद्दमवार यांच्यावर शासकीय कामकाज सुरू असतांना त्यांच्यावर मारहाण केल्याने संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोत रेड्डी बद्दमवार हे विकास कामांची पाहणी करीत असताना त्यांच्यावर अचानक थेट हल्ला करण्यात आला. व त्यांना अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अद्याप अटक न झाल्याने पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
आरोपीला अटक न झाल्यास ९ जानेवारी पासून तालुक्यात कामबंद आंदोलन करण्यात येईल. असा सवाल निवेदनातून देण्यात आला आहे.
४ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुकुटबन येथे घटनेत गणेश चिंतावार याने शासकीय कामात अडथळा आनत ग्रामसेवकाला मारल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी भयभीत झाले आहे.ग्राम पंचायत स्तरावरील कामकाज पुर्णतः ठप्प झाले आहे.ग्रामसेवकावर वाढते हल्ले ही केवळ वैयक्तिक घटना नसुन शासकीय यंञेनेलाच खुले आव्हान देण्याचा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना झरी जामणी शाखेनी व्यक्त केली आहे.
याबाबत गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ, उपयुक्त कार्यकारी अधिकारी ( पंचायत) पोलीस स्टेशन मुकुटबन व ग्रामपंचायत संघटनेला निवेदन सादर करण्यात आले.
तरीही प्रशासन गुन्हेगारांच्या पाठीशी आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्राम पंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिस प्रशासन याकडे लक्ष देनार का याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष वेधले आहे.




