
▪️ दोन शिक्षकांच्या बदल्या……
▪️ आनंदाश्रू….
* वणी तालुक्यातील गोडगाव येथील…
वणी:दि १६/९/२०२५ जिल्हा परिषद शाळेला शिक्षक गळतीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे, त्यांचे परीनाम सर्व विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहे, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवायचे असेल तर शिक्षकच एक संघ होऊन याला रोखता येईल असे प्रयत्न सातत्याने चालू असताना प्रामाणिक शिक्षकांची बदली अचानक एखाद्या शाळेतुन झाली तर जिव्हाळ्याचा माणूस गेल्याची बातमी कानावर पडली की, आनंदाश्रू असे दोन पहलु समोर येतात, श्री संतोष आसुटकार सर ( मुख्याध्यापक) व ईश्वर राऊत सर ह्या दोन शिक्षकांची बदली चा आदेश १६/९/२०२५ ला धडकला तसेच मानाची धडधड वाढली जे शिक्षक कर्तव्य दक्ष, प्रामाणिक, मनमिळावू, सर्व गुण संपन्न असणाऱ्या शिक्षकांना निरोप देताना अनेकांना आनंदाश्रु आवरत नाही, असेच काहीसे या आसुटकार व राऊत सरांच्या बाबतीत आज शिक्षक समारंभ प्रसंगी घडले , शाळा समितीच्या मध्यमातून, या दोन शिक्षकांचा यथोचित सत्कार श्री, अविनाश बोढाले व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ज्योती गोवारदिपे उपाध्यक्ष, सरपंच मंगला आञाम, पोलीस पाटील रामचंद्र खिरटकार, सचिन चंदनकार, प्रविण शेळकी माजी सरपंच, कवडु गावंडे, रोहन काळे, निलेश चिव्हाने, मारोती बोढाले, अतुल बल्की, गणेश दोरखंडे, लिलाधर ठावरी, शंकर चामाटे, वैशाली काळे, सविता चिव्हाने, सरीता काळे, संतोष धोटे, बंडुजी बल्की, करिश्मा चंदनकर, वैशाली धोटे, सुरेखा धाबेकर, श्रद्धा चिव्हाने, भिमराव कुमरे, बल्की, शिवाजी चामाटे इत्यादी सह गावातील सर्व नागरीक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवडु गावंडे यांनी केले, आभार प्रदर्शन करतांना *बदली ही केवळ एका शिक्षकाची होत नाही एक विश्व बदलतं, एक छोटस पण खुप आत्मियतेने प्राण ओतून जपलेलं विश्व…..
बदलीने फक्त शाळा सोडावी लागत नाही
तर एक घर एक जग सोडाव लागतं, असे बोल प्रविण शेळकी यांनी आभार प्रदर्शन करतांना काढले,



