मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वतीने रस्ता रोको आंदोलन…..

0
181

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वतीने रस्ता रोको आंदोलन……..
मारेगांव : तालुक्यातील करंजी ते मारेगांव वरूण घुगूस जाना-या रोडवर अनेक खड्डे पडल्यामुळे अपघात घडत आहेत, जंगली जनावरे रोही डुक्कर अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करत आहे, फाल्टी मिटरचया नावाने लावत असलेले स्मार्ट मिटर लावणे तात्काळ बंद करा,नगर पंचायतील आठवडी बाजार रोडवर न भरवीता मार्केट वार्ड मध्ये भरवावा, मारेगांव,बोटोणी, सराटी, मार्डी व वनोजादेवी येथील अवैध धंदे तात्काळ बंद करा, मारेगांव शहरातील मुख्य रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करा, आपले सरकार चे नावाखाली CSC केंद्र संचालक अनेक लोकांची जादा पैसे घेऊन लूट करीत आहेत, असे निवेदन पुंडलिकराव ढुमणे, अजय रामपुरे, सुरेश भोयर, वासुदेव शेंडे, अशोक सिरसागर, विनोद नेहारे, शंकर पवार, आनंद चिटलवार, सुरेखा मिलांदे, वच्छला पवार, कौतीका मडावी, सुदर्शन टेकाम, भगवान जुनगरी, रामभाऊ, बंडुभाऊ मटकुलवार यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे समस्या सोडविण्यासाठी मागणी केली होती, माञ प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, काॅ श्रीकांत रामकृष्ण तांबेकर यांच्या नेतृत्वाखाली काॅ कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले, पोलीस स्टेशन मारेगांव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांना व काॅ श्रीकांत रामकृष्ण तांबेकर यांच्याशी चर्चा करून आंदोलकांना detain केले व सोडुन दिले,