स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा….
वांजरी येथे स्वातंत्र्य दिन साजरा
वणी : तालुक्यातील वांजरी येथे १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८,०० वाजता शाळा सुधार समितीचे अध्यक्ष संदिप घोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, ध्वजारोहणाला मानवंदना केली आणी राष्ट्रगीत सादर केले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधार समितीचे अध्यक्ष संदिप घोसले यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले, भविष्यात देश सेवा करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन केले, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरूणा जेनेकार सरपंच, सुनिता तेलतुंबडे पोलीस पाटील, अमोल कुंभारे उपसरपंच, विनीता तेलंग आशा सेविका, अनिता जाधव आशा सेविका, चेतना काकडे कृषी सखी, रत्नमाला सपाट कृषी सखी, खुशबू तेलतुंबडे कृषी सखी, अखिल भारतीय संविधान हक्क परीषद चे अध्यक्ष लक्ष्मण सिडाम, संतोष आञाम, सचिन आञाम, संतोष आञाम, स्वप्नील पेंदोर, नवनाथ तेलतुंबडे रोजगार सेवक, रोजगार सेवक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक वर्ग व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,




