▪️शिवसेना उबाठा वणी तर्फे जनसुरक्षा काळा कायदा रद्द करण्यासाठी सरकार विरोधात तुफान निदर्शने
पक्ष प्रमुख मा उद्धवसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार राज्यभर 10 जुलै रोजी जनसूरक्षा कायदा 2025 विधेयक पारित केले.हा कायदा लोकशाही संपुष्टात हाणून देशात हुकूमशाही बळजबरीने लादण्याचा सरकारचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना मा .मुख्यमंत्री उद्धवसाहेबांनी राज्यभर निषेध आंदोलने करण्याचा आदेश दिला,त्या आदेशान्वये नुसार वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजयभाऊ देरकर, यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख संजय निखाडे, यांचे नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख दिपकभाऊ कोकास, तालुका प्रमुख संतोष कुचनकर, जिल्हा समन्व्यक सुधीरभाऊ थेरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे,विधानसभा संघटक रविभाऊ बोढेकर, शहर प्रमुख विनोद ढुमणे, मा.दिलिपभाऊ काकडे मा.जि.प. सदस्य यवतमाळ,प्रसिद्ध तालुका प्रमुख सुरेश शेंडे, युवासेना वणी विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे, संभा मते, संजय देठे, अजय चन्ने, मनीष बत्रा, साबीर भाई शेख, स्वप्निल ताजने , राहुल कोलते, राजू गोलाईत, प्रकाश कराड, राजू पारोधी,
यांचेसह महिला पदाधिकारी सौ किरणताई देरकर,सौ सुरेखाताई ढेंगळे, सौ गिताताई उपरे व शिवसेना उबाठाचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी यांना जनसुरक्षा काळा कायदा रद्द करण्यासाठी निवेदन दिले आहे. त्या अनुषंगाने तहसील वणी समोर काळ्या कायद्याविरोधात व सरकार विरोधात तुफान निदर्शने देऊन निषेध व्यक्त केला आणि किरणताई देरकर संजय निखाडे दिलीप काकडे यांनी हा सामान्य जनतेवर हुकूमशाही लादणारा लोकशाही संपुष्टात आणणारा काळा कायदा रद्द न केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण जिल्यात करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे यांनी सरकारला दिला आहे.




