वांजरी येथे शेतकरी राज्याच्या वतीने बैलपोळा साजरा

0
67

वांजरी येथे बैलपोळा सन साजरा….
वणी – तालुक्यातील वांजरी येथे दि, 22 ऑगस्ट ला पोळा हा सण शेतकरी राज्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
बैलांना आंघोळ करून त्यांना रंग लावण्यात आले, शिंगावर तेल लावून रंगीत कागद लावण्यात आले व त्यांच्यावर झुळ माळा व फुलांच्या माळा घालण्यात आला, शेतकरी राजा आपल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात, कृतज्ञता प्रेम व सेवा यांची शिकवण देतात, शेतकरी यांच्या वतीने भजन व गुळी बैलांच्या अंगावर फिरवून राॅली काढण्यात आली, शेवटी पोलीस पाटील यांच्या हस्ते तोरण तोडण्यात आले ,