
आकाश मोजतो आम्ही जीद्द आणि चिकारीमुळे
झरी स्वप्न उराशी बाळगून जीद्दीने पेटलेल्या कहाण्या आपण वाचतो/ पाहतो पण अशीच आकाशाला गवसणी घातलेल्या श्रीजीत वंदनाताई पुरूषोत्तम आवारी कहाणी आदिवासी बहुल झरी जामणी सिधीवाढोणा या खेडयातुन आलेल्या मुलाने पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले असुन त्यांची फिलीपीन्स या देशातुन ट्रेनिंग झाली स्वताहती श्रीजीत कमर्शियल पायलट असुन स्वताची पायलट ट्रेनींग एकॅडेमी निर्माण केली आहे, खेळयातील मुला – मुलीचे पायलट होण्य करीता ज्या अडचणीला समोर जावे लागते त्यापासून होणारी हेडसान ( यशापयश) यापासून मार्ग शोधण्यासाठी ही एकॅडेमी निर्माण केली असून फीनीक्स पक्षा सारखे ही फीनीक्स एकॅडेमी श्रीजीत ने निर्माण करून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे, श्रीजीतचे बालपणापासून पायलट होण्याचे स्वप्न पण त्याला लागणाऱ्या अमाप संपत्ती खर्चामुळे आपले स्वप्न भंग होईल पण आपल्या स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांनी आपण पायलट होण्याची ईछा आईला – वडीलांना सांगीतले आपल्या मुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व परिकष्टाची हमी दोघांनी दिल्यावर श्रीजीतने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली, २०१९ ला अभियांञीक पदवी पुर्ण केल्या नंतर मी नौकरी आणि उद्योजगतेच्या जगात प्रवेश केल्या नंतर मी नौकरी आणि उद्योजगतेच्या जगात प्रवेश केला, १८ महीन्यात माझे परिक्षण पुर्ण होईल असे सांगितले पण अनेक अडचणीला समोर गेल्यावर रिफंड नाकारल्याने मी स्वतःला गुगूल युट्यूबच्या मदतीने DGCA परीक्षा ची तयारी सुरू केली, काही पायलट भेटले अनेकांनी मार्गदर्शन केले मी परीक्षा पास झालो मी स्वतःहा निर्णय घेतला परदेशात जाऊन CPL प्ररिक्षण पुर्ण केले, आज श्रीजीत अभिमानाने सांगतो की मी पायलट आहे यात माझे आई – वडील मार्ग दर्शक यांना यांचे श्रेय जाते, आज १८० अधिक विद्यार्थी या ॳॅप वरून PPL CPL आणि ATPL परीक्षा साठी विषय शिकतात अनेक अनुभवी पायलट कडून मार्गदर्शन आज मिळतात श्रीजीत चे स्वप्न आहे , कोणत्याही विखुरल्याचे पायलट होण्याचे स्वप्न चुकीच्या माहितीमुळे किंवा मार्गदर्शनामुळे भंग होऊ नये पाठशालाच्या माध्यमातून मी शितल अधिक सुलभ पारदर्शक आणि प्रेरणादायी करायचा प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त लोकांचे पायलट होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे असे भाष्य श्रीजीतच्या सत्कार प्रसंगी सिंधीवाढोणा तेथे केले आहे, त्यांच्या मुळ गावी त्यांचा सत्कार श्री विनोद निखाडे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला,या प्रसंगी सिंधीवाढोणा गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर गानफाडे, रामचंद्र आस्वले गुरुजी, उज्वला आवारी उपसरपंच, मंगेश मोहीतकार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी जामणी, राजु आसुटकार गुरुजी, संजिव आस्वले गुरुजी, मनहोर निखाडे , दयालाल काकडे, राजिव आस्वले, गणपती आवारी, गजानन म निखाडे, किशोर गेडाम, कवडु ठमके राजकुमार पाचभाई, सुभाष आस्वले, विजय देठे, आशिष महाकुलकार, बिजाराम निखाडे, राकेश उपरे, मारोती ज निखाडे, शामराव आवारी, राकेश उपरे,व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दि 22 ऑगस्ट रोजी सागत सत्कार घेण्यात आला, कार्यक्रमाचे आयोजन गावकरी यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमीत बुरडकार यांनी केले, आभार प्रदर्शन करतांना
ज्यांची स्वप्ने दमदार असतात
त्यांनाच ध्येय प्राप्ती होते….
फक्त पंख असुनही काहिही फरक पडत नाही
जिद्दी मुळे उड्डाण सफल होते, असे बोलून सुमीत बुरडकार यांनी कार्यक्रमाचा सांगत केला,



