सार्वला नायगाव जवळ भिषण अपघात ………
वणी- उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती वणी येथे कार्यरत असणारे श्री भास्कर नानाजी कुमरे मु कोपरी ता.राळेगाव जि.यवतमाळ येथील भास्कर कुमरे वणी वरून वरोरा दरम्यान रोज निशी प्रवास करीत असे, पण दि,२१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता च्या सुमारास गावाकडे जात असताना सार्वला नायगाव जवळ सिमेंट कंटेनरचा ट्रक गाडी क्रमांक M.H. 34 B.G.7766 वर्दळीच्या मार्गावर उभा असलेला ट्रकला M.H.29B.B.4449 दुचाकी स्वार भास्कर नानाजी कुमरे यांनी ट्रकला जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यांना प्रथमोपचारा करीता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तपासणी अंती डॉक्टरांनी मृत घोषित केले असुन त्यांच्या मुत्यु पश्चात त्यांची पत्नी एक 2वर्षाची मुलगी व आई असा परीवार असुन सदर भिषण अपघाताने मुत्युमुखी पडलेल्या भास्कर नानाजी कुमरे निधनाने सर्वञ वणी उमेद कार्यालय वणी पंचायत समिती कार्यालय येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.




