श्री गणेश स्थापने प्रित्यर्थ विविध कार्यक्रम

0
60

श्री गणेश स्थापने प्रित्यर्थ विविध कार्यक्रम
नवसाला पावणारा गणपती
वणी – तालुक्यातील बाबापुर येथे, दरवर्षी प्रमाणे दि, २७ ऑगस्ट ला श्री गणेश चतुर्थी स्थापन करण्यात येत आहे, गणेश उत्सव हा भारतातील अत्यंत लोकप्रिय उत्सव म्हणून मानला जातो, दरवर्षी हा उत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते, गणेश चतुर्थी हा एक प्रकारचा सन म्हणून गावकरी साजरा करतात, या सनाला घरोघरी भाविक भक्त दर्शनाला मोठ्या संख्येने पाहुणे म्हणून येतात, गावकरी बाहेर गाहुन येणाऱ्या भाविकांना दर्शन घेण्याकरिता सहकारी करतात, हा गणपती भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण करतात, म्हणून या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जातात, श्री गणेश स्थापने प्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, बाबापुर हे गाव कायर वरून पुर्व दिशेला आहे व ते ३ किलो मीटर अंतरावर आहे, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांना ग्रामवासी यांच्या वतीने विनंती करण्यात येते आहे,