घरकुल लाभार्थ्यी उघड्यावरच! शासनाची ५ ब्रास वाळू योजना कागदावरच
तालुका प्रतिनिधी
वणी ; तालुक्यात घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणाचाच घाला बसला आहे .
महाराष्ट्र शासनाने घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत वाळू देण्याचे स्पष्ट आदेश दिला असतांना वणी,झरी व मारेगाव तालुक्यात ही योजना फक्त कागदावरच राहिली आहे. शेकडो गरीब कुटुंबाची घर अर्धवट अवस्थेत अडकून पडली आहेत.
प्रधान मंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी माता, मोदी आवास आदी योजनेतुंन घर मंजूर झाली आहे. परंतु बांधकामासाठी अत्यावश्यक असलेली वाळू मिळत नसल्याने घरकुल धारक लाभार्थी माञ हातात फाईल घेऊन कार्यालयात फिरताना दिसत आहे.
वणी तालुक्यात सन २०२४ -२५ व २०२५ – २६ या वर्षाच्या कालावधीत शासनाकडून एकूण ५२६० घरकूल मंजूर देण्यात आली आहे. यापैकी ८६७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, तब्बल ४३९३ घरकुलांचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे.
शासन निर्णया नुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती पुरवठा करणे बंधनकारक असतांना प्रशासनाकडून रेतीची उपलब्धता करून दिली जात नसल्याने ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
या संदर्भात युवा सेना व शिवसेनेच्या पदाधिकारीऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वणी तसेच तहसीलदार वणी यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, रेती अभावी अनेक लाभार्थ्यांची घरे अर्धवट असून काही लाभार्थ्यांनी तर आपली जुनी घरे पाडून नवीन घरांच्या आशेवर संसार उघड्यावर मांडला आहे. नैसर्गिक आपत्तीचा
सामना करीत लाभार्थी दिवस काढत आहे.
जर तातडीने मोफत वाळू उपलब्ध करून दिली नाही तर लाभार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परीस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनातून स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.
हे निवेदन सादर करतांना आयुष रोहीदास ठाकरे ( युवा सेना वणी विधानसभा समन्वयक) अजिंक्य शेंडे ( उपजिल्हा प्रमुख, युवा सेना) सुरेश दादाजी शेंडे ( शिवसेना प्रसिध्दी , तालुका प्रमुख वणी) मिलींद बावणे, अनिकेत बल्की व नितेश मालेकर हे निवेदन सादर करतांना उपस्थित होते.




