” कायर येथे मोफत वाळू वाटप ”
घरकुल लाभार्थ्यी यांना मोठा दिलासा
तालुका प्रतिनिधी
वणी : कायर येथे अनेक दिवसांपासून रेती अभावी घरकुल कामाला स्थगिती देण्यात आली होती. पाच ते सहा हजार रूपये प्रमाणे रेती खरिदी करणे घरकुल लाभार्थ्यी यांना अवघड जात होते.
मोफत वाळू निर्णयामुळे घरकुल बांधकामाला चालना मिळाली आहे. घरकूल बांधकामांवरील आर्थिक बोजा कमी झाला आहे.
कायर येथे दि, 2/2/2026 रोज सोमवार ला ग्रामपंचायत कायर च्या वतीने घरकुल लाभार्थ्यी यांना वाळू मोफत देण्याच्या सुचना देण्यात आल्या असून. ग्रामपंचायत कायर येथील सरपंच श्री नागेश धनकसार, श्री नंदकिशोर अंबोरे ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी मेश्राम साहेब, ग्राम महसूल अधिकारी आकाश डोहे, कृषी विस्तार अधिकारी तलवारे साहेब, महसुल सेवक पवन पचारे, रोजगार शेवक देविदास पुलेवार, शंकर सोयाम व घरकुल लाभार्थ्यी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




