वणी नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा

0
93

वणी नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा
नगराध्यक्षपदी विद्या आत्राम यांचा दणदणीत विजय

वणी : प्रतिनिधी (झरि जामणी योगेश मडावी)

वणी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या विद्या आत्राम यांनी १५,३७७ मते मिळवत शिवसेना (उबाठा)च्या संचिता नगराळे (१०,५८५) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
नगराध्यक्षपदासह बहुतांश प्रभागांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक ३, ४, ५, १०, ११ व १२ मध्ये भाजपाने सर्व जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना (उबाठा)ने दोन्ही जागा जिंकल्या, तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये काँग्रेसने दोन्ही जागांवर विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक २ व ९ मध्ये अपक्ष उमेदवारांनीही विजय मिळवत निवडणूक रंगतदार केली. प्रभाग क्रमांक १४ मध्ये संमिश्र निकाल लागला असून भाजपाच्या मनिषा गव्हाणे यांनी अवघ्या तीन मतांनी विजय मिळवला, हे या निवडणुकीचे विशेष ठरले.
एकूणच नगरपालिकेवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून नगराध्यक्षपदावरील दणदणीत विजयामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.