अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ : मनसेचा विजयाचा निर्धार!

0
79

अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६: मनसेचा विजयाचा निर्धार!
तालुका प्रतिनिधी
अकोला : आगामी अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माननीय श्री. राजूभाऊ उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, ज्यात जिल्हाध्यक्ष राजेश काळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष प्रशंसाताई अंभरे, शहराध्यक्ष सौरभ भगत, शहराध्यक्ष राकेश शर्मा, जिल्हा सचिव ललित यावलकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले आणि मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड यांनी आपली उपस्थिती दर्शवून संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला.
या बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज असलेले इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला शहराच्या विकासासाठी आणि राजसाहेब ठाकरेंच्या लोकहिताच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. ‘आता फक्त मनसे’ हा नारा देत अकोल्याच्या राजकारणात परिवर्तनाची लाट आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाली आहे.