झरी येथे भारतीय संविधान दिन व विदर्भाचे राॅबिन हुड क्रांतीवीर श्यामा दादा कोलाम यांची जयंती साजरी

0
51

झरी येथे भारतीय संविधान दिन व विदर्भाचे राॅबिन हुड क्रांतीवीर श्यामा दादा कोलाम यांची जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी

झरी जामणी – आदिवासींचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी पुजिपती धर्माच व्यवस्थेविरुद्ध जल जंगल जमीन बाबत उलगुलान पेटविणाऱ्या व आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने जागृत करून त्यांचात सांस्कृतिक व सामाजिक एकात्मतेची ज्योत प्रज्वलीत करणारा विदर्भाचे राॅबिनहुड क्रांतीवीर श्यामा दादा कोलाम यांच्या जयंती निमित्त दि.२६ नोव्हेंबर झरी जामणी येथे त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

२६ नोव्हेंबर हा केवळ एक दिवसांक नाही तर विदर्भ आणि मराठवाडा आणि तेलंगाना सीमा भागातील शोषित जनतेसाठी ” न्याय ” जन्माला आल्याची ती तारीख आहे.

२६ नोव्हेंबर हा दिवस ‘ संविधान दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान आहे.असे मत मारोती कुसराम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाला श्री, विठ्ठल काटकर, श्री, विनोद पेरकावार पोलीस पाटील झरी जामणी, श्री विठ्ठल उईके साहेब, श्री, नामदेवरावजी किनाके साहेब, श्री, तुकाराम दादा आञाम, श्री, श्रीधर भाऊ कोडापे, क्रांतीवीर श्यामा दादा कोलाम समाज संघटनेचे अध्यक्ष श्री कैलास आञाम, श्री, पांडुरंग टेकाम झमकोला, ननुभाऊ कोडापे झरी, श्री, बाबाराव आञाम कमलापुर, श्री, अनिल आञाम कमलापुर, श्री, नागेश्वर सोयाम झरी, श्री, दत्ता परचाके जामणी, श्री अनिल आञाम कमलापुर, श्री, सुनील सोयाम शिरोला, मोहीतकर झरी, श्री बंडुभाऊ नगराळे दुर्गापुर, श्री अनिल सोयाम झरी, श्री, बापुराव टेकाम मांडला, श्री मारोती मेश्राम अडकोली, मारोती माधवराव कुसराम पिंप्रड व सर्व समाज बांधव झरी जामणी वासी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास आञाम यांनी केले व आभार प्रदर्शन ननुभाऊ कोडापे झरी यांनी केले