महाराष्ट्र राज्य किसान सभेचा 28 ऑक्टोबरला नागपूर येथे महाएल्गार मोर्चा

0
50

*महाराष्ट्र राज्य किसान सभेचा 28 ऑक्टोबरला नागपूर येथे महाएल्गार मोर्चा – वणी क्षेत्रातुन हजारो शेतकरी सहभागी होणार – लोकनेते काॅ.अनिल हेपट*
*वणी* — शेतकऱ्यांना फुटकी कवडी देखील पीकविमा नुकसान भरपाई न देणाऱ्या पीकविमा कंपन्यांना 1 हेक्टर सोयाबीन साठी GR काढून ₹16500/- अनुदान पीकविमा हप्त्यापोटी हे सरकार देते
आणि शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्तांना मदत केवळ ₹8500/- तेही नुकसानीच्या 0%वर देण्याची जाहीरात करुन
पीककर्ज पुनर्गठन जाहीर करुन आणखी कर्जाच्या गर्तेत शेतकरयांना ढकलता..या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभा आता चुप बसणार नाही असा इशारा किसान सभेचे राज्य कौंसिलर काॅ.अनिल हेपट यांनी दिला.28 ॴॅक्टोबर .रोजी नागपूर येथे लाखो शेतकरी एकत्र. येऊन शासनाविरोधात एल्गार पुकारणार आहेत.या आंदोलनात वणी विधानसभा मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने शेतकरयांनी सहभागी व्हावे असे आवाहन काॅ.अनिल हेपट,अनिल घाटे,मोरेश्वर कूंटलवार,रवी गोरे,पंढरी मोहीतकार,गणेश कळसकर,प्रविण आडे,गुलाबराव उमरतकर,द्वारका ईमडवार,मनोहर पचारे,विनायक नन्नोरे,गुणवंत डुकरे,अनंत कदम,गोपाल काळे,रामभाऊ दाभेकर,मारोतराव ईमडवार,रामकृष्ण महल्ले,अनुराधा उटाणे,विजया पावडे,राजे तेलतुंबडे ॶॅड.गजानन पखाले आदीनी केले आहे.