अचलपूर विधानसभा क्षेत्रात काॅंग्रेस पक्षाची तयारी जोमात सुरू..

0
70

●अचलपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाची तयारी पूर्ण जोमात सुरू आहे….
तालुका प्रतिनिधी
वणी:निवडणूकीचे वारे जसे वाहू लागले तसे प्रत्येक पक्ष आपली मोट बांधण्याच्या तयारीत असते.आपल्या पक्षाचा अजेंडा राबविताना रणनिती आखुन हित शत्रुला नामोहरम करण्यासाठी सर्व साम-दाम-भेद कार्यकर्ते चे अहोरात्र भरघोस काम करण्याची उर्जा भरण्यासाठी चांदूरबाजार आणि अचलपूर तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांसाठीची पूर्वतयारी करण्यासाठी निरीक्षकांच्या भूमिकेत एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला कार्यकर्त्यांनी उत्साहाने हजेरी लावली आणि भरघोस प्रतिसाद दिला. काँग्रेसचे सर्व नेते आणि पदाधिकारी यात सहभागी झाले होते. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला असुन या आढावा बैठकीत
– संजय खाडे, प्रभारी,सह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.