*वणी विधानसभा मतदारसंघ आयोजित भव्य मनसे गरबा महोत्सव*
बक्षीस वितरण सोहळा थाटात पार…..!
तालुका प्रतिनिधी
वणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी विधानसभा मतदारसंघ आयोजित केलेला भव्य मनसे गरबा महोत्सवा चा बक्षीस वितरण सोहळा दि, १ आक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला, मनसे नेते राजु उंबरकर यांची कन्या कु, मुक्ता उंबरकर व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांना यथोचित गौरव करण्यात आला, यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी, मनसे सैनिक आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, गेल्या २० दिवसा पासून चालू असलेल्या या गरबा महोत्सवाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि यश अविस्मरणीय आहे, हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले, त्या माझ्या सर्व सहकारी, हितचिंतक, परीक्षक आणि स्पर्धकांचे मी मन पूर्वक आभार मानतो, व उर्वरित सर्व स्पर्धकांना मनसे नेते राजु उंबरकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,




