*हजारोच्या संख्येने आदिवासी जमातीचा वणी उपविभागीय कार्यालयावर धडकला आरक्षण बचाव भव्य आक्रोश मोर्चा*
*वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव वणी शहरात दाखल होऊन महाराष्ट्र शासनाला उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत दिले निवेदन*
*आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी व मारेगाव यांचे आयोजनाला भरभरून यश*
तालुका प्रतिनिधी |
वणी :
आदिवासी समाजाला सामाजिकतेच्या आधारे भारतीय संविधानात आरक्षण देण्यात आले असून ते कोणत्याही जातीला देता येत नाही असे असताना. हैदराबाद गॅजेट ला अनुसरून महाराष्ट्रातील बंजारा, वंजारी, कैकाडी, हटकर, धनगर इत्यादी जाती अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी मध्ये आरक्षण मागत असून ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन करून महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही जाती अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करीत नसून कोणालाही आदिवासी समाजात समाविष्ट करून नये व बंजारा, वंजारी, कैकाडी, धनगर हटकर इत्यादी जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीकरिता आदिवासी समाज संघटनांनी एकत्र येऊन आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी झरी व मारेगाव तयार करून या समितीद्वारे दिनांक 29/09/2025 रोजी वणी शहरात आरक्षण बचाव भव्य मोर्चाचे आयोजन केले, या रॅलीत वणी मारेगाव झरी तालुक्यातील हजारोच्या संख्येने आदिवासी बंधू-भगिनी, युवा-युवती, डॉक्टर, वकील, पत्रकार बंधू वणीत दाखल होऊन आदिवासी आरक्षण बचाव रॅलीत सामील झालेत. आरक्षण बचाव रॅली ची सुरुवात शासकीय मैदान येथून झाली असून तिथे आदिवासी समाजातील विचारवंतांनी समाजाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर रॅली वणी शहरातील प्रमुख मार्गाने विविध नारे देऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकली व कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण महाराष्ट्र सरकारने कोणत्याही स्वरूपात देऊ नये असे रीतसर लेखी निवेदन देऊन सुचविले. परंतु जर सत्तेच्या भुकेपोटी सरकारने आदिवासींचे हक्काचे आरक्षण दिले तर यापुढे आदिवासी समाज शांत बसणार नसून आदिवासी समाज पेटून उठेल व यापुढे उग्र आंदोलन करेल व त्याची सर्व जबाबदारी शासनाची असेल अशी प्रखर भूमिका आदिवासी जमावांनी प्रशासनाद्वारे शासनाला कळविली. या रॅलीला यशस्वी करण्याकरिता परिसरातील सर्व समाज संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतोनात परिश्रम घेऊन रॅली यशस्वीरित्या पार पडली.




