आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने आदिवासी विकास मंञांना निवेदन…

0
87

आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने आदिवासी विकास मंञांना निवेदन…..
यवतमाळ दि 20 – 9 -2025 महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक ऊईके साहेब यांना यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बांधव यांच्या वतीने माननीय मंत्री अशोक ऊईके साहेब यांना आदिवासी विभाग प्रकल्प अंतर्गत मौजा कोडपा ता, जि लातूर येथील MDA राॅयल ईटंर नॅशनल स्कूल येथे 2025 ते 2026 या चालू वर्षात शैक्षणिक सञात वर्ग 5 ते 7 वी मध्ये नियमीत शिक्षण घेत असतांना वरील शाळेची मान्यता शासनाने रद्द केली असून सरळ शाळा बंद झालेली आहे, करीता आदिवासी विभाग प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या CBSE मधुन शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना सैनिक पब्लिक स्कूल वडकी ता राळेगाव जि यवतमाळ या नामांकित शाळेत स्थानांतरित करण्यात यावे, सर्व मुला – मुलींना याच शाळेत प्रवेश देण्यात यावा, अशा प्रकारे निवेदन देण्यात आले,
*सन्माननीय प्रा अशोक ऊईके आदिवासी विकास विभाग मंञी महाराष्ट्र राज्य भेट घेऊन आदिवासी विकास विभाग प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शाळा विषय चर्चा करण्यात आली, व्यवस्थापना कडून विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने मंञी मोहदय साहेबांना निवेदन देऊन तत्काळ संबंधित आयुक्त यांना फोन करून विचारना केली, व महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्प अधिकारी यांना पत्र पाठवून त्या त्या शाळेची माहिती मागवून देण्यात व शाळेची व्यवस्था योग्य नसल्यास पालक वर्ग म्हणेल ती शाळा तत्काळ बदलून देण्यात यावी या साठी साहेबांनी असे आदेश पञ दिले, निवेदन देतांना रोहीत गेडाम, मारोती कुसराम, नन्नुभाऊ कोडापे, अविनाश गेडाम, नितीन मेश्राम, मनोज मेश्राम, उमेश आञाम, प्रशांत आञाम, चंद्रकांत कुळसंगे, संगीता सोयाम, विलास कुमरे, व आदी मान्यवर उपस्थित होते, सन्माननीय मंञी मोहदय साहेबांच्या या निर्णयाचे सर्वांनी आभार मानले,