चिमूर क्रांती जिल्हा निर्मीतीसाठी शासनाला समिती च्या वतीने निवेदन……

0
119

चिमूर – क्रांती जिल्हा निर्मीतीची अनेक वर्षांपासून ची मागणी प्रलंबित असून शासन स्तरावर सातत्याने निवेदन देण्यात येत असून चिमूर क्रांती जिल्हा संघर्ष समितीचे वतीने ५ जानेवारी ९ जानेवारी ला निवेदन देत असतात, आज दि, ११ ऑगस्ट रोजी चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुल मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांना अपर जिल्हाधिकारी थीटे मार्फत निवेदन देण्यात आले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर करांनी प्रानांची आहूती देत मोलाची भुमिका बजावली होती, त्यात बालाजी रायपुरे हा युवक स्वातंत्र्यासाठी शाहिद झाला, त्यामुळे क्रांती भूमी आहे, ताडोबा येते आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाघ आहे, रामदेगी, मुक्ताई, सात बहिणी डोंगर असे पर्यटन आहे, तसेच चिमूर हे चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा व गडचिरोली पासून १०० किमी दरम्यान आहे, चिमूर क्रांती निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व काळे गुरुजी यांनी ४५ वर्षांपासून चळवळ उभी केली होती, आणि आजही चिमूर क्रांती समिती च्या माध्यमातून लढा सुरू आहे, अपर जिल्हाधिकारी थीटे व उपविभागीय अधिकारी घाडगे यांना निवेदन देत असतांना केशवराव डोमाजी वरखडे,प्रा संजय पिठाडे, डॉ दिलीप शिवरकर, सुभाष शेषकर, रमेश खेटे, प्रा माहादेव पिसे, डॉ महेशं खानेकर,ऍड महेश दत्त काळे , ऍड सोनू श्रीरामे, ऍड सुभाष नन्नावरे, ऍड शैनेशचंद्र श्रीरामे, ऍड संदिप हिंगे, ऍड नितीन रामटेके, ऍड भुस्कुटे,रवी मासुरकर, धर्मराज गेडाम, मोतीराम कुळमेथे,पठाण सर, कैलास रामपूरे सह आदि उपस्थित होते,