राष्ट्रीय आदिवासी वेशभूषा स्पर्धेत ग्रीष्म कुसराम ठरला राज्यभरातून पहिला….
किनवटच्या कुडमते आणि कनाके यांना दुसरा क्रमांक
विशेष प्रतिनिधी,
किनवट/माहूर:
भूमिका फिल्म प्रोडक्शन तर्फे आयोजित आदिवासी वेशभूषा स्पर्धा १० जुलै ते एक ऑगस्ट पर्यंत घेण्यात घेण्यात आली होती.स्पर्धाच निकाल ता.९ रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी जाहीर करण्यात आला असून यामध्ये मूळचा तलाईगुडा व सध्या वाईबाजार येथील रहिवासी ग्रीष्म भीमराव कुसराम या आदिवासी मॉडेलने प्रथम क्रमांक पटकावित राज्यस्तरावर प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर नांदेड जिल्ह्यामधून शुभांगी कुडमते आणि शुभांगी कनाके ह्या दोघीं सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आलेली आहे.
ग्रीष्म कुसराम हा नेहमी आदिवासी संस्कृती कला व पारंपारिक वेशभूषा इत्यादी मध्ये निपुण राहिला आहे.यापूर्वी सुद्धा त्याला सन २०२३ मध्ये मिस्टर इंडिया या सौंदर्य स्पर्धेत राज्यातून पहिला येण्याचा मान मिळाला होता.विविध आदिवासी नृत्य स्पर्धा इत्यादीमध्येही त्याचा समावेश राहिला आहे. ग्रीष्म कुसराम सोबतच नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील शुभांगी कुडमते आणि शुभांगी कनाके यांनी सुद्धा राज्यस्तरीय आदिवासी वेशभूषा स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे.दरम्यान माहूर किनवट तालुक्यातील स्पर्धकांनी राज्य पातळीवर मिळवलेल्या या यशाबद्दल किनवटचे आमदार भीमराव केराम,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्यासह अनेकांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.
फोटो: आदिवासी वेशभूषेत ग्रीष्म कुसराम.




