जागतिक आदिवासी दिना निमित्त राॅलीचे आयोजन

0
103

सन्माननीय समाज बांधवांना जय सेवा जय बिरसा

संपूर्ण जगातील आदिवासी जमातीकरीता संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला असून त्या दिवशी संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो.

वणी परिसरातील सर्व आदिवासी समाज बांधवांना सूचित करण्यात येते की 9 ऑगस्ट 2025 रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त वणी शहरात बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. करिता आपण सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आदिवासी गौरव रॅलीत उपस्थित रहावे.

रॅलीचा दिनांक – 09 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता

स्थळ — भीमालपेण देवस्थान येथून रॅलीला सुरुवात होईल

आपला समाज बांधव

ॲड. अरविंद सिडाम

आदिवासी जनजागृती युवा संघटना

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏