*वणीत ‘संस्कृती जागर’ गरबा महोत्सव उत्साहाचा महासागर*
वणी: येथील राम शेवाळकर परिसरात महाराष्टाच्या समृद्ध संस्कृतीचा जागर करत, २६ सप्टेंबर रोजी मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी आयोजित केलेला भव्य गरबा महोत्सव तुफान उत्साहात पार पडला.
या उत्सवाला प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विशेष म्हणजे, पावसाच्या हजेरीला न जुमानता वणीकर जनतेने अलोट गर्दी केली आणि शेवटपर्यंत आपला उत्साह कायम ठेवला.
सत्काराला उत्तर देताना तेजस्विनी पंडित यांनी राजूभाऊंच्या कार्याचे कौतुक केले आणि गरबा नृत्य सादर करून उपस्थितांना आनंद दिला.
वणीच्या सांस्कृतिक जीवनात उत्साह निर्माण करणाऱ्या या ‘संस्कृती जागर’ उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन.




