आरक्षण बचावासाठी वणीत भव्य मोर्चा…..

0
114

●आरक्षण बचावासाठी वणीत भव्य मोर्चा…
●एक तीर एक कमान सभी आदीवासी एक समान…
वणी:संविधानाने अनु-जाती-जमातीला त्यांच्या सर्वागीण विकासासाठी आरक्षणाची तरतूद संविधानात केली असुन आजही सर्वागाने आदिवासी समाजाचा विकास झालेला नाहीत. दैनंदिन अवनी च्या गरजा करीता आदिवासी जमात आजही गडचिरोली ते बस्तरच्या जंगलात दरी -डोंगर-कपारी तुडवीत आहे आजही यवतमाळ जिल्ह्यातील वणी पासून ओ च्या हाकेवर असलेला झरी जामणी आदिवासी बहूल एरीया बघीतला तर वा मेळघाट येथील “माना”आंध” कुमारी माता-कुपोषण-आरोग्य- बालमृत्यू-शिक्षण-बेरोजगारी-महागाई च्या काळात उत्पादनाचे एकमेव शेती साधन असलेल्या आदिवासी समाजाची जल-जमीन-जंगल शासन गिळंकृत करीत बड्या जमिनदाराला देत आहे यांचे वास्तव आपण बघत आहो अशा क्षणाला आपली सामाजिक-आर्थिक-राजकीय परीस्थिती शाबुत ठेवण्यासाठी कवच म्हणून संविधानाने आरक्षण बाहाल केले पण त्यावर इतर बंजारा-धनगर समाज आदिवासी समाजाच्या आरक्षणात मागणी करीत असुन ते घटनाद्रोही आहे. संविधानाने बंजारा-धनगर इतर समाजाला आरक्षणाची तरतुद प्रत्येकाला वेगवेगळी केली असुन आपले हक्क हे भिक मागुन मिळत नसते तर ते लढूनच मिळतात हे आजवरच्या आरक्षण बचावासाठी लढलेल्या लढाई ने दाखवून दिले आहे. तरी आज आपले आरक्षण अबाधित राहीले तर पुढच्या पिढीचे दिवस चांगले राहतील जर आज आपण घरी बसुन सडून मरण्यापेक्षा रस्त्यावर लढुन मेलेले बरे मी माझ्या हक्कासाठी माझ्या पुढच्या पिढीसाठी “आरक्षण बचाव भव्य मोर्चात दि.२९/९/२०२५ रोजी दुपारी १२.००वाजता वणी येथील भिमालपेन देवस्थान पाण्याच्या टाकीजवळ येथून भव्य मोर्चाचे आयोजन केले असुन यात वणी-झरी-मारेगाव या तालुक्यातील सर्व जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी हक्क व आरक्षण बचाव क्रृती समीती व आदिवासी समाजातील सर्व संघटनांनी केली आहे.