मुळ मालकांना हरविलेले मोबाईल परत

0
99

पोलीस स्टेशन वणी येथे विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल विविध ठिकाणावरून गहाळ झाल्याबद्दल सविस्तर तक्रार दिली होती, त्या तक्रारीची अनुषंगाने पोलीस स्टेशन वणी येथील सायबर विभागामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस अंमलदार छाया उमरे यांनी CElR पोर्टल वरून तांत्रिक दृष्टीकोनातून उत्कृष्ट तपास करीत एकुण १३ मोबाईल शोधून काढले असून सदरचे हरवलेले मोबाईल हस्तगत करून आज दि १८/९/२०२५ मोबाईल धारक मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत, सदरची कार्यवाही मा, ठाणेदार साहेब वणी यांचे मार्गदर्शनात LPC 493 छाया उमरे यांनी केली आहे, हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित मोबाईल धारकांनी पोलीस स्टेशन वणी यांचे आभार मानले आहेत,