जेष्ठ नागरिक गणेशपुर वतीने स्वातंत्र्य दिन साजरा…

0
186

*चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ व ग्रामवाचनालय गणेशपूर चे वतीने स्वातंत्र्य दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न*

.

चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशिय मंडळ व ग्रामवाचनालय गणेशपूर चे वतीने जेष्ठ नागरिक भवन गणेशपूर येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी जेष्ठ नागरिक भवनाच्या पटांगणात झालेल्या कार्यक्रमात श्री.उदयराव गोहोकार अध्यक्ष चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ गणेशपूर यांनी ध्वजारोहण केले.श्री.वसंतराव उपरे यांनी ध्वजगीत गायन करुन श्री.अशोकराव चौधरी यांनी मधुर स्वरात ऐ मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गायन केले.

यानंतर जेष्ठ नागरिक भवनात आयोजित केलेल्या सभेचे अध्यक्ष श्री.उदयराव गोहोकार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.पांडुरंग व-हाटे , सेवानिवृत्त प्राचार्य श्री.नितीन मोहितकार व गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते श्री. विनायक बोबडे इ होते.

यावेळी झालेल्या मार्गदर्शनात श्री.पांडुरंग व-हाटे यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून त्याचे जतन करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे असे सांगितले तर श्री.विनायक बोबडे यांनी देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी आपण व सर्व मुलांनी थोर स्वातंत्र्यसेनानी,थोर पुरुष यांच्या पुस्तकाचे वाचन करण्याची गरज आहे असे सांगितले तर श्री नितीन मोहितकार यांनी अहिंसक मार्गाने स्वांतत्र्य मीळवून देणारे महात्मा गांधी यांच्या चरित्राचा अभ्यास भारता प्रमाणेच जगभरातील जनता करीत आहेत याबाबत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात श्री.उदयराव गोहोकार यांनी मंडळाच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन सर्व उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

प्रास्ताविकेतुन जेष्ठ नागरिक मंडळाच्या आयस्काम व फेस्काम बाबत माहिती श्री.रामदास बोढे सचीव यांनी दिली.

नियोजनबद्ध संचलन श्री.नाना विधाते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.लक्ष्मण इद्दे यांनी केले.या कार्यक्रमास 65 जेष्ठ नागरिक सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.गुलाबराव निते,महादेवराव खंगार,भास्करराव खारकर,श्री.जगदीश ठावरी,सौ.छाया लिचोडे ग्रंथपाल

इ नी सहकार्य केले.