नांदेपेरा येते जागतिक आदिवासी दिन‌‌‌ साजरा

0
36

*नांदेपेरा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा*

●विविध पहेरावात आदिवासी बांधव…

●अनेक मान्यवरांची खास उपस्थिती…

वणी तालुक्यातील. नांदेपेरा मध्ये प्रथमच जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या जागतिक आदिवासी दिनानिमित्त अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.श्री देविदास चांदेकर,पवण मेश्राम,सुचित उइके,पवण कोडापे, शुभम केळकर.यांचे नेतृत्वात करण्यात आले होते. या आदिवासी अधिकार मंच चे संयुक्त विद्यमाने संपूर्ण नांदेपेरा गावातून डीजे च्या माध्यमातून विविध आदिवासी ड्रेस परीधान करून रॅली काढून मेळावा घेण्यात आले व या रॅली मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री सुधाकर चांदेकर बिरसा ब्रिगेड तालुका वणी तर प्रमुख पाहुणे श्री देविदास चांदेकर शाखा व्यवस्थापक दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वणी, विलास चिकटे सरपंच ग्रा.पं., प्रकाश बारेकर पोलिस पाटील नांदेपेरा.अश्विनी पोहेकर,प्रिती करमनकर, यांनी आदिवासी दिन या प्रसंगी प्रमुख पाहुणे चे स्थान ग्रहण करून श्री देविदास चांदेकर यांनी आपले मनोगतातून संबोधित करत असतांना जगातील आदिवासी दिवस कधी साजरा केला जातो तो तुम्हाला माहित आहे का? एक असा दिवस आहे जो संपूर्ण जगभरात एक आदिवासी लोकांच्या हक्कासाठी साजरा केला जातो. ९ ऑगस्ट दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो .१९९४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघा मध्ये जागतिक आदिवासी या दिनाला मान्यता दिली. समाज जे जंगलात -डोंगरात..दरी खोर्यात राहून जंगलाचे अस्तित्व टिकवून ठेवले आदिवासी आजही पारंपारिक पद्धतीने राहतात.त्याचे अस्तित्व, संस्कृती भाषा आणि हक्क हे आज हि संकटात आहे .त्यांना शिक्षण, आरोग्य जमीन आणि सामाजिक न्याय मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर आवाज उठवला जातो. आणि म्हणून international day of world indigenous peoples हा दिवस ठरतो. आदिवासीचा अभिमानाचा दिवस आपल्या मुळापासून आपल्या संस्कृती पासून आपण दुर जाऊ नये म्हणून ९ ऑगस्ट हा दिवस आपल्याला आठवण करून देत असतो.साजरा करण्यासाठी सकाळपासूनच सुरुवात झाली होती. यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, चे आयोजन करण्यात आले होते.

 

आदिवासी दिन साजरा करण्यासाठी असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर गावातील नागरिक बांधव इतरही जन लोक सहभागी झालेल्या बांधवांमध्ये आनंद आणि मोठा उत्साह दिसत होता. आदिवासी दिनाच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांमध्ये एकता, सद्भावना, एकमेकांबद्दलचे प्रेम, आपुलकी दिसून येत होती.

 

कार्यक्रमच्या सुरुवातीला झेंडा वंदन करून रॅली गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. आदिवासी नृत्य सादर करण्यात आली. यामध्ये पुरुष, महिला, मुले, मुली सर्वांनी सहभाग घेतला होता. या पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक आदिवासी कला सर्वांसमोर येत होती. या पारंपारिक नृत्यांच्या माध्यमातून पारंपारिक आदिवासी कलेचे दर्शन होत होते. या नृत्यांच्या माध्यमातून पारंपारिक नृत्य टिकली पाहिजेत. असा संदेश दिला जात होता. विषेश म्हणजे नांदेपेरा गावात जागतिक आदिवासी दिन सत्तर वर्षाच्या काळात पहिल्यांदा भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.या रॅली व मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी श्री पवण मेश्राम श्री पुंडलिक उइके,रामाजी उइके,पवण कोडापे, शैलेंद्र उइके, वामण केळकर,संदिप घोडाम, सुचित उइके,बंडुजी तोडसाम, दिपक केळकर श्रीकांत कुमरे, प्रकाश केळकर, कार्तिक उइके,धनराज केळकर,गजानन उइके,राजु उइके,शुभम केळकर, एकनाथजी रायसिडाम, एकनाथजी मेश्राम,राहुल ठमके,गणेश परचाके, विठ्ठल परचाके, अनिल कुळसंगे, निलेश कुमरे,भारत मेश्राम,पिंटु कुमरे ,राजुजी ठमके,निखिल गोडाम, मारोती कुमरे,गोलु कुमरे,पंढरी उइके, रिता मेश्राम,लंका दुर्वे, प्रांजली चांदेकर, नम्रता किनाके,गिता केळकर, आशाताई कुडमेथे, आशाताई घोडाम,कुंदाताई चांदेकर,निशाताई चांदेकर,प्रतिभा कुमरे,फुलाबाई दंळाजे, गंगुबाई मेश्राम,सुशिलाबाई मरस कोल्हे,दिपा कुमरे प्रणाली मेश्राम व समस्त आदिवासी समाजांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.व या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन :-शुभम केळकर

प्रास्ताविक:-पवण मेश्राम

आभार प्रदर्शन:-सौ पल्लवी मेश्राम