पाटण आई देवस्थान माथार्जुन येथे कोलाम समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
तालुका प्रतिनिधी:
झरी जामणी: कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शामादादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग’ स्थापन करण्याच्या मागणीसाठी माथार्जुन येथील पाटण आई देवस्थान येथे दिनांक १३ मार्च २०२६ (शुक्रवार) रोजी कोलाम समाजाची तातडीची व महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीत कोलाम समाजातील नायक, महाजन, घट्या, कारभारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि समाजातील विविध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या विविध समस्या, विकासासाठी आवश्यक उपाययोजना तसेच कोलाम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीसाठी समाजातील विविध गावांमधील बांधव उपस्थित राहून एकजुटीचा संदेश दिला. समाजाच्या हक्कांसाठी पुढील काळात एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीचे आयोजन गंगाधर अय्या आत्राम सरपंच, गट ग्रामपंचायत मांडवा, जानराव दांडजे, रूपेश टेकाम, किशोर मेश्राम, सतीश टेकाम उपसरपंच, रायपूर, सामाजिक कार्यकर्ते योगेश मडावी, अशोक आत्राम व कृष्णा टेकाम यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
बैठक दुपारी १२ वाजता सुरू होऊन यशस्वीरीत्या संपन्न झाली.




