मनसेच्या आंदोलनाला यश; रासा–साखरा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाची लेखी ग्वाही
तालुका प्रतिनिधी:
वणी : रासा ते साखरा मार्गावरील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छेडलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात तसेच फाल्गुन गोहोकार यांच्या पुढाकाराने विभाग प्रमुख लक्ष्मण उपरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनानंतर प्रशासनाला आंदोलनासमोर झुकावे लागले असून संबंधित विभागाने लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे. सध्या या रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात डांबरी बुजवून (डागडुजी) दुरुस्ती करण्यात येणार असून मार्च महिन्यानंतर या रस्त्याच्या पूर्ण नूतनीकरणासाठी पुढील कार्यवाही करून पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
मनसेच्या या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने अखेर लक्ष दिल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
या आंदोलनादरम्यान मनसैनिकांसह असंख्य गावकरी उपस्थित होते. यामध्ये भोला चिकनकर, प्रतीक पानगटे, नंदलाल अहिरकर, संकेत मोहिते, सुरेश दुधकोहळ, उमेश झाडे, निखिल आस्वले, रोशन थाटे आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मनसेच्या या लढ्यामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.




