पाटन पोलीस स्टेशनची नवीन कार्यकारिणी जाहीर

0
172

*पाटण पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर*

झरि जामणी:प्रतिनिधी- योगेश मडावी

झरीजामणी : आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत विश्राम गृह, झरीजामणी येथे पोलीस पाटील संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
बैठकीत उपस्थित सदस्यांच्या बहुमताने पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद पेरकावार पाटील, उपाध्यक्षपदी माणिक शेदे पाटील, सचिवपदी सचिन कुळसगे पाटील तर सहसचिवपदी प्रकाश मेश्राम पाटील यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल उपस्थित सदस्यांनी समाधान व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच पोलीस पाटीलांच्या समस्या, हक्क व मागण्यांसाठी संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीस पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.