ग्राम पंचायत वांजरी येथे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
✍️ खुशबू तेलतुंबडे ▪️ तालुका प्रतिनिधी
वणी : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत वांजरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या अरूणाताई जेणेकर सरपंच वांजरी, अनिता जाधव आशा सेविका, चेतना काकडे कृषी सखी ,संगीता बोबडे ICRP रत्नमाला सपाट कृषी सखी, कमलाकर परचाके कर्मचारी, बेबी डोंगे अंगणवाडी सेविका, खुशबू तेलतुंबडे, अमोल बोबडे कर्मचारी व गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्राम पंचायत वांजरी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
‘ मुलगी शिकली प्रगती झाली.’ ‘ बेटी बचालो बेटी पढाओ : ‘ मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान ‘ असे नारे लावून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.




