सिंधीवाढोणा येथे ” कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन” स्वागत समारंभ व भुमिपुजन

0
87

सिंधीवाढोणा ” कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन ” स्वागत समारंभ व भुमिपुजन
तालुका प्रतिनिधी

झरी जामणी : झरी जामणी तालुक्यातील सिंधीवाढोणा येथे छञपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ यांच्या वतीने पुरूषांचे कबड्डीचे सामने आयोजन करण्यात येते . दरवर्षी प्रमाणे
या वर्षी सुद्धा कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री पुरुषोत्तम केशव आवारी ( संचालक, वसंत जिनींग) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री विनोद निखाडे ( सरपंच ग्रामपंचायत सिधीवाढोणा) यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शविली. तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सौ वंदनाताई पुरूषोत्तम आवारी ( जिल्हा अध्यक्षा , महिला काॅंग्रेस कमेटी यवतमाळ) तसेच ज्ञानेश्वर गानफाडे ( पोलीस पाटील सिंधीवाढोणा) सौ उज्वला गणपती आवारी (उपसरपंच सिंधीवाढोणा) मा श्री मंगेश मोहीतकार ( उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी जामणी) मा श्री विजय मांडवकार (अध्यक्ष,ग्रा. विकास सोसायटी) रिताबाई रविंद्र उपरे ( सदस्य ग्रा. विकास सोसायटी) संतोष आसुटकार ( सदस्य. ग्रा. विकास सोसायटी) दिवाकर महाकुलकार ( सदस्य. ग्रा. विकास सोसायटी) सुभाष निखाडे ( सदस्य, ग्रा.विकास सोसायटी) मा श्री काशिनाथ निब्रड शिक्षक, मा श्री राजीव आस्वले ( माजी उपसरपंच) सुभाष आस्वले ( अध्यक्ष, छञपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ) दिनेश मोहीतकार ( तंटामुक्ती अध्यक्ष सिंधीवाढोणा) गजानन मधन निखाडे ( अध्यक्ष, देवस्थान कमिटी) गणपती आवारी ( माजी शाळा सुधार समिती अध्यक्ष) मा श्री बद्दमवार साहेब ( ग्राम विकास अधिकारी सिंधीवाढोणा) कैलास निखाडे, मा श्री चंद्रकांत उईके, आशिष महाकुलकार, निखील महाकुलकार, संकेत काकडे, विजय देठे, संजय महाकुलकार, निखाडे गुरूजी, धनराज निखाडे, चंदु घुगूल, दत्तु काळे, मधन निखाडे, मा श्री अरूण निखाडे ( माजी तंटामुक्ती अध्यक्ष) पुरूषोत्तम निखाडे व गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यानंतर उपस्थित अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत झाले.

प्रत्येक यशाच पाऊल……..
ज्यांच्याकडे वळते
जीवन कसे जगावे…….
ज्यांना पाहून कळते
कर्तव्य म्हणजे काय? …….
हे ज्यांना पाहून कळते
अशा कर्तव्यदक्ष व्यक्तीमहतवांचा सन्मान. झरी जामणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा वसंत जिनींगचे संचालक मा श्री पुरुषोत्तम केशव आवारी यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल गावकरी व छञपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

ग्राम विकास सोसायटी सिंधीवाढोणा चे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या हस्ते नविन ईमारत बांधकाम चे भुमीपुजन करण्यात आले.

या क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना सुमित बुरडकार यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.