*योगेश मडावी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!*
तालुका प्रतिनिधी
झरि जामणी: सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असलेले तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच तत्पर राहणारे योगेश मडावी यांचा आज वाढदिवस आहे.
समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवणारे, सत्यनिष्ठ व निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून योगेश मडावी यांची ओळख आहे. समाजसेवा, लोकजागृती आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून त्यांनी समाजात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, सहकारी तसेच सामाजिक व पत्रकारितेतील मान्यवरांकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्व स्तरातून “योगेश मडावी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व समाजकार्यात अधिक यश लाभो” अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.




