शिवसेनेच्या ढाण्या वाघाला अखेरचा : जय महाराष्ट्र….!

0
204

शिवसेनेच्या ढाण्या वाघाला अखेरचा : जय महाराष्ट्र…!
तालुका प्रतिनिधी

वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्री. विश्वासभाऊ नांदेकर यांच्या निधनाने वणी-झरी-मारेगाव परिसरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. जनसामान्यांशी नाळ जोडलेला एक अभ्यासू आणि संघर्षातून उभा राहिलेला ‘लोकनेता’ आज आपण गमावला आहे.

आज त्यांच्या मूळ गावी ‘पठारपूर’ येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी परीसरात नागरिक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व नांदेकर परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन सांत्वन केले.
विश्वासभाऊंचे व्यक्तिमत्त्व म्हणजे लढवय्या बाणा, स्पष्ट आणि रोखठोक बोलणे. सामान्यांच्या प्रश्नांवर त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या बोलण्यातील स्पष्टवक्तेपणामुळे आणि अन्यायाविरुद्ध उठवलेल्या आवाजामुळे प्रशासनावर त्यांची एक वेगळीच ‘जरब’ होती. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच आक्रमकपणे मैदानात उतरले.

“विश्वास भाऊंचे जनसेवेचे कार्य आणि त्यांच्या आठवणी यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासात आणि जनमानसात सदैव जिवंत राहतील.”
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो, हीच प्रार्थना.

अंत्यसंस्काराप्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड, विद्यमान आमदार संजयभाऊ देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, संजीवरेड्डी बोदकुरवार, किरणवहिनी, राजेंद्रभाऊ गायकवाड यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.