सतपल्ली येथे संयुक्त जयंती–पुण्यतिथीनिमित्त समाजप्रबोधन कार्यक्रम
प्रतिनिधी: योगेश मडावी
सतपल्ली (ता. झरी जामणी, जि. यवतमाळ) येथे दि. २० डिसेंबर २०२५ (शनिवार) रोजी महामाया बुद्ध विहार कमिटीच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन, भीमाई निर्वाण दिन व संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त संयुक्त समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कव्वाल विकास राजा (नागपूर–काटोल) यांचा समाजप्रबोधनाचा कार्यक्रम व गावातून भव्य रॅली काढण्यात आली. भीमसैनिकांनी हातात झाडू घेऊन गाव स्वच्छता करत सामाजिक संदेश दिला.
कार्यक्रमाला तहसीलदार अक्षय रासने व पोलीस निरीक्षक स्वप्नील ठाकरे उपस्थित होते. विश्वजित कांबळे, श्यामराव मुनेश्वर व प्रवीण गांजरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जितेंद्र निमसरकर, सूत्रसंचालन अजय निमसरकर यांनी केले.
यावेळी बुद्ध मूर्तीचे लोकार्पण, समाजकार्यकर्त्यांचा सन्मान, विहार सौंदर्यीकरण करणारे चित्रकार प्रशांत निमसरकर यांचा सत्कार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिजिटल फ्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.




