माझी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे निधन

0
222

माझी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे निधन…

💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

✍️ तालुका प्रतिनिधी

वणी : वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आणि शिवशेना ( शिंदे) गटाचे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा संपर्क प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांचे रविवारी मध्यरात्री मुंबई येथे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होता. रविवार अचानक तब्येत बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

धळाळीची ओळख असनारे विश्वासभाऊ नांदेकर त्यांनी २००४ ते २००९ या काळात वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून नेञुत्व केले.

राजकीय प्रवास करीत असताना त्यांची नेञुत्व शैली संघटनेवर एकहाती पकड व प्रशासनावर वचक ठेवणारी होती. राजकीय व्यक्तीमत्व व जनतेसाठी सदैव झटनारे कर्तव्यनिष्ठ व संवेदनशील राजकारणी म्हणून ते जनतेत लोकप्रिय होते.

मागील एक महिन्या पासून ते मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. यादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात जावून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तबीयत ची विचारपुस केली होती.
त्यांच्या निधनाने वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.
मुंबईवरून त्यांचे पार्थिव शरीर वणी येथील राहते घरी आणून अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.