जि प उच्च प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा येथे क्रीडा महोत्सव समारोह मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला

0
159

जि प उच्च प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा येथे क्रीडा महोत्सव समारोह मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला

तालुका प्रतिनिधी

झरी जामणी – दि १६ डिसेंबर रोजी क्रीडा महोत्सव जि प उच्च प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा येथील शाळेच्या मैदानावर साजरा करण्यात आला,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री अतुल निखाडे ( अध्यक्ष शाळा सुधार समिती सिंधीवाढोणा) यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शविली, त्याच बरोबर उद्वघाटक म्हणुन मा श्री विनोद निखाडे ( सरपंच ग्रामपंचायत सिधीवाढोणा)हे उपस्थित होते,तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रमुख पाहुणे मा श्री निलेश खैरनार साहेब ( गटशिक्षण अधिकारी पं समिती झरी जामणी) व मा श्री मोहन काटकर ( विस्तार अधिकारी पं समिती झरी जामणी) तसेच मा श्री बद्दमवार साहेब ( ग्राम विकास अधिकारी सिंधीवाढोणा) मा श्री लक्ष्मण काकरवार सर ( केंद्र प्रमुख बोपापूर) मा श्री माधव उदार सर ( केंद्र प्रमुख मुकूटबन) मा श्री बबन चांदेकर (मुख्याध्यापक जि प उच्च प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा),श्री विलास शहारे ( सहशिक्षक जि प उच्च प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा) कु हर्षदा चोपणे(शिक्षिका जि प उच्च प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा) कु, हिमाणी भोयर( सहा,शिक्षिका सिंधीवाढोणा) मा श्री हाते सर (जगन्नाथ सागर विद्यालय कोसारा) मा श्री ज्ञानेश्वर गानफाडे ( पोलीस पाटील सिंधीवाढोणा) मा श्री राजीव आस्वले, मा श्री मंगेश मोहीतकार,( उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी जामणी),मा श्री राकेश उपरे, मा श्री अरूण झाडे, मा श्री गणपती आवारी, मा श्री आशिष महाकुलकार , सुमित बुरडकार, महेंद्र मोहुलॅ, तसेच शिक्षक वृंद व गावातील नागरिक महिला व पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते,
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलनाने झाली, यानंतर उपस्थित अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांचे स्वागत बुके देऊन करण्यात आले ,
या नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत झाले, प्रसताविकानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली, यामध्ये विद्यार्थीनी सुंदर असे नृत्य – नाट्य सादरीकरण केले, विद्यार्थीनी आपल्या विविध कला गुणांचे सादरीकरण केले,
” क्रीडा महोत्सामुळे विद्यार्थीचां सर्वांगीण विकास होतो, निर्णय क्षमता, सहानुभूती शिस्त, आणि सहकार्याची भावना निर्माण होते, आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो ” कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा श्री निलेश खैरनार ( गटशिक्षण अधिकारी पं समिती झरी जामणी) यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
या क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु हर्षदा चोपणे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु, हिमाणी भोयर मॅडम यांनी केले,