भरटा गौतम चोर….. पोलीस स्टेशन मे मचाये शोर

0
119

▪️भुरटा गौतम चोर..पोलीस स्टेशन मे मचाये शोर.

सुरेश शेंडे: निवासी उपसंपादक

वणी : येथील चोखामेळा बुद्ध मंडळाच्या जुन्या विहाराला नष्ट करण्यात आले त्यातील लोखंडी अँगल काही विटा निघाल्या त्यातून आपल्या घराचा उद्धार करण्यासाठी तेथीलच वास्तव्य असणाऱ्या गौतम उद्धव कांबळे या भुरट्या चोरांनी लोखंडी अँगल व विटा चोरून नेण्याची घटना सम्राट अशोक नगर वणी येथे घडली सविस्तर असे की वणी तहसील कोर्ट परिसरा मध्ये अर्जनविस चे काम करणाऱ्या गौतम ची कहाणी समाजासाठी मिच कसा राबतो. असे सांगणाऱ्या गौतम नामक इसम हा विहारातील लोखंडी अँगल व विटा चोरून नेतो तेव्हा हाच गौतम समाजात आपली पत आहे.ज्यांनी समाजात माझी खूप इज्जत आहे.असे छातीठोकपणे सांगणाऱ्या गौतमची जेव्हा चोखामेळा मंडळाच्या अध्यक्षा सौ लता संजय पाटील अध्यक्ष व सौ विमल प्रदीप चिकाटे उपाध्यक्ष यांनी अँगल आणि विटा चोरून नेत असल्याचे गौतमला सीसीटीव्हीच्या माध्यमातून पकडले तेव्हा त्याचे बिंग फुटले त्याचा खरा चेहरा समाजा समोर आला समाजातील लोकांनी त्यांच्यावर रोष व्यक्त करीत त्याला समाजातून बहिष्कृत करण्यात यावे चोर हा चोर असतो त्याला जात धर्म नसतो असा जेव्हा रोष समाजातुन उठला तेव्हा ह्याच गौतमची पाट थोपटत वणीचे पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर चोखामेळा मंडळाच्या महिलांना व समाजाला तुम्ही चार ते सहा महिने झोपून होते का असा सवाल उंबरकर पोलिस निरीक्षक यांनी केल्यानंतर लगेच तीथुन गौतम ची छाती टाईट होते. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्यावर खोटे-नाटे आड घेण्यात येत आहे अशी खोटी बतावणी करत गौतम चोर मचाये पोलिस स्टेशन मे शोर ..पण समाजही मानत नाही तो थोर… सदर बाब राकेश पाटील यांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर दिसली नसती तर आपल्या समाजात असे गद्दार लोक असतात हे समाजाला समजले नसते म्हणूनच विहाराच्या नवनिर्मितीसाठी अहोरात्र झटणाऱ्या बौद्ध समाजात लोक आज वणी पोलिस ठाण्यात येऊन गौतमवर गुन्हा दाखल केला. ज्या समाजाच्या घामाच्या कष्टातून हे विहार उभं व्हावं यासाठी अनेक हात राबत असताना असा प्रकार हा निंदनीय आहे तरी गौतम यास कठोर शासन व्हावे ही मागणी घेऊन चोखामेळा मंडळ व सदस्य आणि वणी येथील समाजातील जनतेनेही केलाआहे जर यानंतर गौतम चे वागणे असेच राहिले तर त्याला नक्कीच शासन होईल अशी पोलीस अधिकारी यांनी ग्वाही दिली असुन सदर तक्रार उपविभागीय पोलिस अधिकारी वणी,मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ आणि मा.पोलीस महानिरीक्षक अमरावती यांना देखील दीली आहे.या प्रसंगी वणीतील चोखामेळा बुद्ध मंडळ वणी येथील पदाधिकारी व सदस्य समाजातील ५३ सदस्यांनी स्वाक्षरी करुन लेखी तक्रार दाखल केली आहे.