▪️जेतवन बुद्ध विहार नांदेपेरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली…
तालुका प्रतिनिधी
वणी : तालुक्यातील मौजा नांदेपेरा येथे भारतीय बौद्ध महासभा तथा रमाबाई महीला मंडळ शाखा नांदेपेरा/पोहणा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधान निर्माता पं. पुज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून जेतवन बुद्ध विहार येथे महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पांडुरंग मजगवळी,व कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री मुनेश्वर सर मुख्याध्यापक श्री गुरुदेव प्राथमिक मराठी शाळा नांदेपेरा, ग्रामपंचायत नांदेपेरा येथील सरपंच श्री विलासराव चिकटे, सुरेश दादाजी शेंडे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेपेरा/पोहणा , श्री सुखदेव जी येरेकर, श्री भास्कररावजी खामनकर समाजसेवक, श्री ताराचंदजी वनकर मा.सचिव, यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण करून व बाबासाहेब यांना पुष्पा माला अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यात आले तसेच भारतीय बौद्ध महासभा तथा रमाबाई महिला मंडळ नांदेपेरा/पोहना च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सांय.७ वा भिम ज्योत धम्म रॅली मुख्य मार्गक्रम करून ग्रामपंचायत नांदेपेरा रंगमंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले त्या नंतर जेतवन बुद्ध विहारात संध्याकाळी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक:-श्री संतोष रामटेके
सुत्रसंचलन:-श्री सुरेश शेंडे
प्रस्ताविक:-श्री रवी वनकर
व समाज बांधव व गावातील सर्व नागरीक उपस्थित होते.




