वांजरी येथे जागतिक मृदा दिन साजरा

0
129

प्रतिनिधी : खुशबू तेलतुंबडे
वणी : दिनांक ०५/१२/२०२५ ला सकाळी ठिक ९:०० वाजता ग्राम पंचायत कार्यालय वांजरी येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला असून जमीनीची सुपीकता म्हणजेच आरोग्य कसे चांगले राखता येईल यासाठी शेताचे माती परीक्षण करून घेऊन आपल्या जमीनीमध्ये पिकासाठी आवश्यक असणारे घटक किती प्रमाणात आहेत व आपल्याला किती प्रमाणात वरून खते देण्याची आवश्यकता आहे या संपूर्ण बाबी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हरभरा व गहू पिकावरील किड व रोग नियंत्रण बाबत तसेच कृषी विस्तार ॲप डाउनलोड करून त्याचा वापर कसा करावा याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली . तसेच नैसर्गिक शेती मिशन बाबत निळोळी अर्क कसा तयार करावा व त्याचे किडनियंत्रणासाठी फायदे बाबत माहिती दिली. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच अरुणाताई जेनेकार मॅडम होत्या तसेच कार्यक्रमास गावातील शेतकरी बंधुंनी उपस्थिती दर्शविली कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी कृषिताई खुशबू तेलतुंबळे , कृषिसखी रत्नमाला सपाट,नवनाथ तेलतुंबडे, चेतना काकडे कृषी सखी व सहाय्यक कृषि अधिकारी बि. व्हि. वनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले