कायर येथे “दंडार” लोकनृत्य सादर

0
62

कायर येथे ” दंडार” लोकनृत्य सादर

‘ आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमान ‘

तालुका प्रतिनिधी
वणी – तालुक्यातील कायर येथे दि १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाच्या सांस्कृतिचा अभिमान असलेले आणि समाज जोडणीसाठी प्रतिक ठरलेले ” दंडार” लोकनृत्य सादर करण्यात आले.
तंत्रज्ञानाच्या युगातही मोबाईल आणि इंटरनेटने प्रत्येक घरात पाय रोवले आहेत तरी आदिवासी संस्कृतीचा वारसा असलेले “दंडार” लोकनृत्य समाज जोडणीसाठी प्रतिक आहे.
” दंडार” हे केवळ लोकनृत्य नसुन आदिवासी समाजाच्या एकतेचा आणि सांस्कृतिक आणि आत्मीयतेचे सशक्त प्रतिक आहे.
या कार्यक्रमाला कायर येथील सरपंच नागेश धनकसार, कुंदन टोंगे, वाघोजी हिरामण पेंदोर, महेश देशमुख ( पाटील) ट्रस्टचे अध्यक्ष नंदकिशोर अंबोरे, राम देशमुख, अमोल पेंदोर, मुकेश जुनगरी, मंगेश मडावी, साधु मडावी, रोशन मंडपाचे, बाळकृष्ण पेंदोर, रामदास टेकाम, शिलाताई देशमुख, शुष्मा सोयाम, बेबीताई चांदेकर, सुधाकर आञाम, माया येडकाडे, कल्पना उदे, शसीकला टेकाम, शंकर सोयाम, आकाश सोयाम, आशिष पेंदोर, प्रज्योत पेंदोर, ईश्वर मडावी, साधु मडावी, सुरेश मडावी, अतिश सोयाम, नंदकुमार पेंदोर, नितेश आञाम, शञुघन चांदेकर, कैलास उदे, नारायण चांदेकर तसेच आदिवासी समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते